केएफएफने स्वीकारली बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी; म्हणाले...

KFF claims responsibility for killing bank employee
KFF claims responsibility for killing bank employeeKFF claims responsibility for killing bank employee

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी (Terrorist) बँक कर्मचाऱ्याची (bank employee) गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर फ्रीडम फायटर्स (KFF) या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. एवढेच नाही तर केएफएफने एक पत्र जारी करून इशाराही दिला आहे. काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सहभागी असेल, त्याचे पण हेच हाल होईल, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. (KFF claims responsibility for killing bank employee)

काश्मीर फ्रीडम फायटर्स (KFF) या दहशतवादी (Terrorist) संघटनेने पत्र जारी करून म्हटले आहे की, कुलगाममधील आमच्या कॅडरने गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन केले. यामध्ये बँक कर्मचारी (bank employee) विजय कुमार यांचा मृत्यू (killing) झाला. काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सामील असेल त्याचा परिणाम असाच होईल.

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना येथे कायमस्वरूपी ठेवेल या फसवणुकीत जगणाऱ्या बाहेरच्या लोकांसाठी हे डोळे उघडणारे आहे. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागेल हे वास्तव आता बाहेरच्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. विचार करा, अजून उशीर झालेला नाही. पुढचा नंबर तुमचा असू शकतो.

सध्या काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगाममधील मोहनपोरा येथील स्थानिक ग्रामीण बँकेत तैनात विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली. याआधी मंगळवारी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. मे महिन्यात दहशतवाद्यांनी (Terrorist) काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाम येथील कार्यालयात घुसून हत्या केली होती. राहुल भट्ट हे तहसीलमध्ये कार्यरत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com