खलिस्तानी आणि अल-कायदाचा भारताला धोका; हल्ल्याची शक्यता

वृत्तसंस्था
Sunday, 17 January 2021

दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी काही वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर जागोजागी लावले आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची शोधमोहीम सुरु केली आहे.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. 

आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न मार्गी

दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी काही वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर जागोजागी लावले आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची शोधमोहीम सुरु केली आहे. सध्या दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेऊन काही देशविघातक शक्ती कारवाया करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न

या बाबत माहिती देताना कॅनॉट प्लेसचे पोलिस उपअधीक्षक सिद्धार्थ जैन म्हणाले, ‘‘खलिस्तानी व अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी हल्ला केला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे वाँटेड दहशतवाद्यांची पोस्टर लावण्यासह सुरक्षेच्या इतर उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.’’

आणखी वाचा - अजित पवारांनी लक्ष घातलं आणि यंत्रणा घावली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khalistan Al-Qaeda indications terrorist attack republic day