Malaprabha River Incident
esakal
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथे मलप्रभा नदीत शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय १८) या तरुणाचा मृतदेह अखेर रविवारी (ता. २६) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी नदीत गेला (Malaprabha River Accident) असता, पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो ओढला जाऊन बुडाला होता.