
Mallikarjun Kharge
sakal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर कॉंग्रेसने कडाडून टीका केली. हा दौरा म्हणजे केवळ ढोग, दिखावा आणि खचलेल्या लोकांचा गंभीर अपमान असल्याची तोफ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डागली. तसेच इंफाळ आणि चुराचांदपूरमधील नियोजित रोड शो म्हणजे शिबिरांमधील लोकांची दुर्दशा न ऐकता पळ काढण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले.