
पुणेः शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. सोयाबीनच्या हमीभावात ४३६ रुपयांची वाढ झाली असून कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ झाली आहे. आता खरिप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव असेल. तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आहे.