
खुशवंत सिंग हे भारतीय लेखक, वकील, कादंबरीकार, पत्रकार आणि राजकारणी होते. आज त्यांची जयंती. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1915 रोजी हदली, पंजाब, सध्या पाकिस्तानमध्ये झाला. त्यांनी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि आठ वर्षे लाहोर कोर्टात प्रॅक्टिस केली, पण नंतर काही दिवस प्रॅक्टिस सोडली.
खुशवंत सिंग भारतीय पत्रकारितेमधील एक मोठं नाव. तसेच हिंदी उर्दू आणि इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व असलेले लेखक. त्यांचे ‘ट्रेन टू पाकिस्तान’ आणि इतर शेकडो पुस्तके प्रचंड गाजली. जगभर त्यांच्या लेखणीचा मोठा बोलबाला होता.
नेहमी वादात, चर्चेत राहणारे हे लेखक त्यांची कलम पेन नेहमीच महागडी घेणारे असतात असा भ्रम आहे. खरं तर, खुशवंतजींना पेन चोरायची सवय होती. एकदा त्यांनी स्वत:च याबद्दल सांगितले होते.
1998 मध्ये जेव्हा त्यांना 'ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला तेव्हा खुशवंतजी म्हणाले होते की, मी प्रामाणिक नाही. प्रामाणिकपणामध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे दुसऱ्याची वस्तू न घेणे आणि दुसरे कधीही खोटे बोलणे नाही. मी या दोन्ही गोष्टी केल्या आहेत. मला पेन चोरण्याची सवय आहे.
माझ्याकडे महागड्या पेनचा संग्रह असला तरी, पेन चोरण्याचा आनंद तो विकत घेण्यामध्ये नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमाला मी सर्वात आधी पोहोचतो. कारण, मला बुकलेटमध्ये ठेवलेले पेन चोरायचे असतात.
दुसरे म्हणजे, मी नेहमीच खरे बोलतो असे नाही. कारण, मी अनेक वेळा लहान खोटे बोललो आहे. एखादी मुलगी सुंदर नसली तरी मी तिची स्तुती केली आहे. एकदा ते सुंदर महिलांसाठी टॅक्सी ड्रायव्हरही बनले होते. खुशवंतजींनीच तो किस्सा सांगितला होता.
ते एका बिल्डिंगमधून बाहेर पडले आणि त्यांच्या कारमध्ये बसले. तेव्हा दोन गोऱ्या अमेरिकन महिलांनी आवाज दिला. 'टॅक्सी! कॅब ताज हॉटेल. खुशवंत काही बोलायच्या आधीच त्या महिला गाडीचा मागचा दरवाजा उघडून गाडीत बसल्या. खुशवंतजी सरप्राईज झाले पण काहीच न बोलता ते त्या महिलांना ताज हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यावेळी त्या महिलांकडून त्यांनी सात रुपये घेतले. तसेच, दोन रुपयांची टीप घेतली आणि मग घराकडे निघाले.
1947 मध्ये त्यांची विदेश सेवेसाठी निवड झाली होती. त्यांनी टोरंटो आणि कॅनडा येथे स्वतंत्र भारतात सरकारचे माहिती अधिकारी म्हणून काम केले. 1980 ते 1986 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी 'दिल्ली', 'ट्रेन टू पाकिस्तान', 'द कंपनी ऑफ वुमन' अशा अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या. 1974 मध्ये खुशवंत सिंग यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, परंतु त्यांनी
1984 मध्ये अमृतसरच्या 'सुवर्ण मंदिरा'मध्ये केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ तो परत केला. सन 2000 मध्ये त्यांची 'ऑनेस्ट पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवड झाली. 2007 मध्ये त्यांना 'पद्मविभूषण'नेही सन्मानित करण्यात आले होते. 20 मार्च 2014 रोजी त्यांचे निधन झाले.
ते काही काळ भारतीय राज्यसभेचेही सभासद होते. तब्बल 99 वर्ष आयुर्मान लागलेले खुशवंत सिंग अतिशय खुश मिसाज जीवन जगले!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.