esakal | जवान राकेश्वर सिंह यांची नक्षलवाद्यांकडून सुटका; कुटुंबियांचा एकच जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

rakeshawar singh

३ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. दरम्यान, राकेश्वर सिंह यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरी जणू दिवाळीच साजरी केली.

जवान राकेश्वर सिंह यांची नक्षलवाद्यांकडून सुटका; कुटुंबियांचा एकच जल्लोष

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बिजापूरमध्ये सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यावेळी नक्षलवाद्यांनी अपहरण केलेले कोब्रा युनिटचे जवान राकेश्वर सिंह मनहस यांची सुटका करण्यात आली आहे. सीआरपीएफ पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं वृत्त दिलं आहे. ३ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. दरम्यान, राकेश्वर सिंह यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरी जणू दिवाळीच साजरी केली.  

नक्षलवाद्यांनी सुखरुप सुटका केल्यानंतर राकेश्वर सिंह यांच्या पत्नी मीनू यांनी आनंद व्यक्त केला आहे. आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राकेश्वर सिंह घरी परततील याची मला आशा होती असंही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. त्याचबरोबर पतीच्या सुटकेसाठी मीनू यांनी सरकारचे आभार मानले आहेत. आपल्याला अधिकृतरित्या पतीची सुरक्षितरित्या सुटका झाल्याचं सांगण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राकेश्वर सिंह यांची प्रकृती देखील ठीक असल्याचं सीआरपीएफकडून कळवण्यात आल्याचं मीनू म्हणाल्या.

कुटुंबियांचा एकच जल्लोष

राकेश्वर सिंह यांची नक्षलवाद्यांच्या ताब्यातून सुटका झाल्याचे कळताच त्यांच्या घरी कुटुंबियांनी एकच जल्लोष केला. तसेच नाचत गात त्यांनी दिवाळीप्रमाणं आनंद साजरा केला. दरम्यान, राकेश्वर सिंह याना बिजापूर येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये आणण्यात आलं. 

३ एप्रिल रोजी झालं होतं अपहरण

दरम्या, सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनसह यांना ३ एप्रिल रोजी बिजापूर येथे झालेल्या सुरक्षा रक्षकांवरील हल्ल्यावेळी नक्षलवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. या चकमकीत सीआरपीएफचे २३ जवान ठार झाले होते, तसेच नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ३६ नक्षलवादी मारले गेल्याचा दावा सीआरपीएफच्या प्रमुखांनी सांगितलं होतं.
 

loading image