HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

रेवण्णा यांना अपहरणप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
JDS leader HD Revanna
JDS leader HD Revannaesakal
Summary

रेवण्णा आणि सतीश बबन्ना यांच्यावर प्रज्वलने लैंगिक अत्याचार केलेल्या पीडितेचे अपहरण केल्याचा आरोप नोंदवला होता.

बंगळूर : लैंगिक छळ आणि अपहरण प्रकरणात आरोपी असलेले माजी मंत्री आणि होळेनरसिंपूरचे धजद आमदार एच. डी. रेवण्णा (H. D. Revanna) यांना विशेष तपास पथकाने (SIT) शनिवारी ताब्यात घेतले. रेवण्णा यांना अपहरणप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

JDS leader HD Revanna
माजी पंतप्रधानांच्या नातवाविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी; खासदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता!

रेवण्णा यांना शनिवारी संध्याकाळी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान आणि धजद सुप्रिमो एच. डी. देवेगौडा यांच्या पद्मनाभनगर येथील घरातून चौकशी पथकाने ताब्यात घेतले होते. काही क्षणांतच त्यांना अपहरण प्रकरणाच्या संदर्भात विशेष न्यायालयाने अंतरीम दिलासा नाकारला होता. त्यांना एसआयटी कार्यालयात नेण्यात आले.

पहिला गुन्हा २८ एप्रिल रोजी हासनमधील होळेनरसिंपूर टाऊन पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता. जिथे रेवण्णा आणि त्यांचा मुलगा, हासनचे धजद खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्यावर ४७ वर्षीय गृहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

JDS leader HD Revanna
SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

४४ वर्षीय हासन जिल्हा पंचायत सदस्याने प्रज्वलवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर सीआयडीने एक मे रोजी दुसरा गुन्हा दाखल केला. तिसरा गुन्हा २ मे रोजी म्हैसूरमधील केआरनगर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवला. रेवण्णा आणि सतीश बबन्ना यांच्यावर प्रज्वलने लैंगिक अत्याचार केलेल्या पीडितेचे अपहरण केल्याचा आरोप नोंदवला होता. संशयित बबन्ना याला शुक्रवारी अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी तपासकर्त्यांना एका फार्महाऊसमधून अपहृत महिला सापडली. ती म्हैसूरच्या हुन्सूर तालुक्यातील कालेनहळ्ळी गावातील होती.

JDS leader HD Revanna
Chikkodi Lok Sabha : 370 कलम हटवून मोदींनी देशातील दहशतवाद संपविला, 70 वर्षांत काँग्रेसनं काय केलं? अमित शहांचा सवाल

जामिनास नकार

दरम्यान, यापूर्वी के.आर. नगर पोलिसांनी नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यासंदर्भात माजी मंत्री आणि धजद नेते एच. डी. रेवण्णा यांना अंतरिम जामीन देण्यास लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने नकार दिला. याआधी एसआयटीने आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसरी लुकआउट नोटीस जारी केली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com