मुसेवाला हत्या : "मारेकऱ्यांना सोडणार नाही"; केजरीवाल, मान यांची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी देखील मुसेवाला यांच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे.
sidhu moose wala was shot
sidhu moose wala was shot

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे धक्कादायक वृत्त असल्याचं या नेत्यांनी म्हटलं असून शोकही व्यक्त केला आहे. (Killers will not be free Arvind Kejriwal Bhagwant Mann reaction on Siddhu Musawala assassination)

sidhu moose wala was shot
"आम्ही इशारा दिला होता"; गायक मुसेवालाच्या हत्येवरुन भाजपचं 'आप'वर टीकास्त्र

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, "मुसेवाला यांची हत्या झाल्याचं ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झालं. यामध्ये ज्याचा कोणाचा हात असेल त्याला आम्ही सोडणार नाही. मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांचं मी सांत्वन करतो. सर्वांनी शांत रहावं असं मी आवाहन करतो"

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल म्हणाले, सिद्धू मुसेवाला यांची हत्या दुर्देवी आहे. मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी याबाबत बोललो आहे. यामागे ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल. माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी शांत रहावं आणि शांतता राखावी.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, सिद्धू मुसेवाला या एका टॅलेंटेड कालाकाराची आणि काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाल्याचं कळताच मला खूपच धक्का बसला. त्यांच्या प्रियजनांचं आणि जगभरातील चाहत्यांचं मी सांत्वन करतो.

एक दिवस आधी काढून घेतली होती सुरक्षा

काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच त्यांची सुरक्षा हटवली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com