किरण बेंदीच्या ट्विटमुळे केंद्र सरकारची कोंडी

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित वाद्‌ग्रस्त ट्विटचा मुद्दा आज संसदेमध्ये गाजला. संसदेमध्ये "द्रमुक'ने उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे देत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन विरोधकांना केले.

नवी दिल्ली : पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित वाद्‌ग्रस्त ट्विटचा मुद्दा आज संसदेमध्ये गाजला. संसदेमध्ये "द्रमुक'ने उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे देत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन विरोधकांना केले. "द्रमुक'चे नेते टी. आर. बालू यांनी आज लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करीत हा तमीळ जनता आणि राजकीय नेत्यांचा अवमान असल्याचे मत मांडले होते. 

बालू यांचे मत विचारात घेऊन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बेदी यांनी ते ट्विट डिलीट केले असून, यावर खेद व्यक्त करणारे निवेदनही दिले असल्याचे सांगितले. बालू यांनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडताच गृहमंत्रालयाने याची दखल घेत कारवाई देखील केली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, चेन्नईमधील पाणी प्रश्‍नावरून बेदी यांनी आक्षेपार्ह ट्विट केले होते. या समस्येसाठी त्यांनी कमकुवत शासन, भ्रष्ट राजकारणी, कोणतीही गोष्ट अंगाला लावून न घेणारी नोकरशाही आणि स्वार्थी, घाबरट जनता जबाबदार असल्याचे म्हटले होते.

आज लोकसभेमध्ये शून्यप्रहरात "द्रमुक'कडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकारची बाजू लावून धरत बेदी यांनीही माफी मागितल्याचे नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Bedi expressed regret, put issue to rest Rajnath Singh to opposition