

Monsoon Session Impasse
esakal
Kiren Rijiju: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेली कोंडी कायम असताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन दिवसांत सलग दुसऱ्यांदा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, ते इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच सरकारसोबत पुढील निर्णय घेतील.