
चासोटी : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात चशोट गावाला भेट देऊन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. येथे गुरुवारी झालेल्या मोठ्या ढगफुटीतील मृतांची संख्या आता ६० वर गेली असून १०० जण जखमी आहेत. या आपत्तीतील ७५ जण अजूनही बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.