रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणाऱ्या 'त्या' तरुणाचं पुणे कनेक्शन

वयाचं बंधन नसलेल्या शंतनू आणि रतन टाटांच्या मैत्रीची गोष्ट..
Ratan Tata and Shantanu Naidu
Ratan Tata and Shantanu NaiduTwitter
Updated on

भारताचे यशस्वी उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि असंख्य तरुणांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले रतन टाटा (Ratan Tata) यांनी २८ डिसेंबर रोजी अत्यंत साधेपणानं आपला वाढदिवस साजरा केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रतन टाटा हे कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमधल्या एका तरुणाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा तरुण रतन टाटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांच्या खांद्यावरून प्रेमानं हात फिरवतो आणि कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो. त्यांचा वाढदिवस साजरा करणारा हा तरुण आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रतन टाटांना 'याचि देही याचि डोळा' पाहता यावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र व्हिडीओतील या तरुणाला केवळ त्यांना भेटण्याचीच किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचीच नाही तर त्यांच्यासोबत काम करण्याचीही संधी मिळाली आहे. शंतनू नायडू (Shantanu Naidu) असं त्या पुणेकर तरुणाचं नाव आहे. वयाचं बंधन नसलेल्या शंतनू आणि रतन टाटांच्या मैत्रीची गोष्ट ही अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे.

शंतनू हा पुणेकर तरुण सध्या रतन टाटा यांच्यासोबत टाटा ट्रस्टमध्ये काम करतो. कॉलेजमध्ये शिकताना शंतनूने रस्त्यावर वेगवान वाहनांची धडक बसून होणारे कुत्र्यांचे मृत्यू रोखण्यासाठी रंगीत, चमकदार पट्टे बनवले होते. त्याने बनवलेले हे पट्टे कुत्र्यांच्या गळ्यात घातले. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिवे नसतानाही वाहनचालकांना दुरूनच ते दिसत होते आणि परिणामी रस्त्यावरील कुत्र्यांचे प्राण वाचत होते. त्याच्या या कल्पनेने रतन टाटा आणि शंतनू या दोन श्वानप्रेमींना एकत्र आणलं. शंतनूने प्राण्यांसाठी सुरू केलेल्या 'मोटोपॉव्ज' या उद्योगामध्ये टाटांनी गुंतवणूक केली आहे.

शंतनूचे वडील 'टाटा अ‍ॅडव्हान्सेस सिस्टीम्स'मध्ये काम करतात. तर आई शिक्षिका आहे. शंतनूने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापिठातून एमबीएचं शिक्षण घेतलं. या विद्यापिठात पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहण्याचं आश्वासन रतन टाटांनी त्याला दिलं होतं आणि त्यांनी ते पाळलंसुद्धा होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com