काय होती पोखरण अणू चाचणी; कसं वाढलं होतं भारताचं सामर्थ्य?

काय होती पोखरण अणू चाचणी; कसं वाढलं होतं भारताचं सामर्थ्य?

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणूचाचणी! संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 11 मे म्हणजे आजच्याच दिवशी 1998 मध्ये पोखरणमध्ये अणू चाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने उचललेल्या या धाडसी पावलामुळेच देशाच्या प्रगतीला 'बूस्ट' मिळाला होता. जाणून घेऊयात या अणू चाचणीचा रंजक इतिहास...

11 मे ते 13 मे, 1998... या तीन दिवसांच्या कालावधीत भारताने 5 स्फोट करून राजस्थानमधील पोखरणमध्ये चाचण्या घेतल्या होत्या. या चाचण्यांची तयारी कमालीची गोपनीय राखण्यात आली होती. संपूर्ण जगाची पोलिसगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या 'CIA'लाही या चाचणीचा सुगावा लागू शकला नाही, यातच भारताचे राजनैतिक आणि धोरणात्मक यश होतं, असं म्हणावं लागेल. ही मोहीम इतकी गोपनीय राखण्यात आली होती, की केंद्र सरकारमधील निवडक अधिकाऱ्यांनाच यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. किंबहुना, तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनाही याची कल्पना नव्हती.

या मोहिमेविषयी खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, वाजपेयींचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लष्करातील मोजके अधिकारी आणि या प्रकल्पावर काम करणारे 58 इंजिनिअर्स यांनाच या मिशनविषयी कल्पना होती.

काय होती पोखरण अणू चाचणी; कसं वाढलं होतं भारताचं सामर्थ्य?
चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?; पाहा व्हिडिओ

प्रत्यक्ष चाचण्यांपूर्वी दहा दिवस आधी या चाचण्यांची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी यंत्रे आणि इतर साहित्य मुंबईहून केवळ चार ट्रकमधून पोखरणमध्ये आणण्यात आले. अमेरिकी उपग्रहांची भारतावरील 'नजर' चुकवून ही सर्व तयारी करण्यात आली होती. चाचणी घेतल्याचं जाहीर केल्यानंतर केवळ इस्राईल या देशानेच भारताला पाठिंबा दिला होता. अमेरिकेसह अन्य इतर देशांनी भारतावर टीका केली होती. संतप्त अमेरिकेकडून तर भारतावर निर्बंधही लादण्यात आले होते.

वाजपेयी सत्तेत येण्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्‍लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. मात्र, अमेरिकी उपग्रहांनी याची छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला चाचणी घेता आली नव्हती. 1998 मध्ये वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. 'चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल', असा प्रश्‍न वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, 'तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या 30 दिवसांत चाचणी घेऊ!' त्या बैठकीत तारीख ठरली... 11 मे, 1998!

त्या काळात जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे नव्हती. तरीही भारताने धाडस करून हे पाऊल उचलले. या अणुचाचणीची घोषणा करतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभेत तीन महत्त्वाची विधाने केली.

१. कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही.

२. ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही, त्यांच्याविरोधात आम्ही त्यांचा वापर करणार नाही.

३. यापुढे भारत अण्वस्त्र चाचणी घेणार नाही.

काय होती पोखरण अणू चाचणी; कसं वाढलं होतं भारताचं सामर्थ्य?
बॉयफ्रेंडची पोलिसांकडे तक्रार करायला गेली अन् लग्न करूनच आली

त्याकाळात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होती. अमेरिकन सॅटलाइट्सचे पोखरण रेंजवर बारीक लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटलाइटला देखील चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करुन दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कुणालाही कळू नये, यासाठी वैज्ञानिक देखील सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे. या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच...! भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींच्या नेतृत्वलाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिलं. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com