मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी - अमित शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

"मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च (Topmost Congress leaders) नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागणी, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेची उदासिनता अस्विकारार्ह असल्याचंही शहा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. (Top Congress leaders should apologize to people for obstructing PM Modi convoy says Amit Shah)

शहा म्हणाले, "काँग्रेसशासित पंजाबमध्ये घडलेल्या आजच्या घटनेवरुन हा पक्ष कसा विचार करतो आणि कार्य करतो याचा ट्रेलर आहे. जनतेने वारंवार नकार दिल्याने त्यांना वेडेपणाच्या मार्गावर नेले आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या कृत्याबद्दल भारतातील जनतेची माफी मागितली पाहिजे"

गृह मंत्रालयाने पंजाबमधील आजच्या सुरक्षेतील तृटींबाबत तपशीलवार अहवाल मागवला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत अशी उदासीनता पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही शहा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या ताफ्याबाबत काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा आज सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top