Coronavirus : अशी ओळखा कोरोनाची लक्षणे

वृत्तसंस्था
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

अशी झाली सुरुवात

- असे पसरतात कोरोनाचे व्हायरस 

पुणे : कोरोना या व्हायरसने जगभरात अक्षरश: हाहाकार उडवला आहे. या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून खबरदारीही घेतली जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सात विमानतळांवर चीन आणि आसपासच्या भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. विषाणूंचा समूह म्हणजे कोरोना.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मात्र, याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केले आहे. 

अशी झाली सुरुवात

चीनमधील वुहान हा शहरात या व्हायरसची लागण झाली. त्यानंतर चीनमधील इतर भागातही कोरोनाचे रुग्ण आढळले. चीनशिवाय जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. 

असे पसरतात कोरोनाचे व्हायरस 

सर्वसाधारणपणे हवेमार्फत या व्हायरस पसरतात. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिंकणे आणि खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात. त्यातून याची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. 

काय आहेत कोरोनाची लक्षणे 

कोरोना हे एका विषाणूच्या समूहाचे नाव आहे. सध्या सर्दी-खोकल्यापासून ते गंभीर आजारासाठी हे विषाणू कारणीभूत असतात. 

खबरदारीचे उपाय

हात वारंवार धुणे शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरणे अर्धवट शिजवलेले, कच्चे मांस खाऊ नये. 

पुण्यात निदानाची सुविधा

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत निदानाची सुविधा उपलब्ध आहेत. यातील गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, जीवनावश्यक प्रणाली सुविधा कार्यरत राहतील, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know more about Symptoms of Coronavirus