स्वातंत्र्य मिळताच 'हा' पदार्थ वाटून कोल्हापुरात झाला होता जल्लोष

स्वातंत्र्य मिळताच 'हा' पदार्थ वाटून कोल्हापुरात  झाला होता जल्लोष

कोल्हापूर : खरंतर कोल्हापूर हे पेठ्यांचे आणि गल्लीचे शहर. प्रत्येक पेठेला एक वेगळे महत्त्व आहे. कोणताही सण- समारंभ हा जल्लोषातच केला जातो. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ही कोल्हापुरात एका वेगळ्याच रंगात आणि ढंगात जल्लोष साजरा झाला होता. प्रत्येकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे हा जल्लोष केला होता. स्वातंत्र्य दिनाचा हा जल्लोष कोल्हापूरात त्यावेळीही आगळा आणि वेगळा ठरला होता.

Summary

देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ही कोल्हापुरात एका वेगळ्याच रंगात आणि ढंगात जल्लोष साजरा झाला होता.

स्वातंत्र्य मिळताच 'हा' पदार्थ वाटून कोल्हापुरात  झाला होता जल्लोष
कोल्हापुरात असा केला जातो 'स्वातंत्रदिन' साजरा

अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. १५० वर्षाच्या जुलमी राजवटीतून मुक्त  होत भारत स्वतंत्र झाला. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारत देश आनंदोत्सवात न्हाऊन निघाला. असाच उत्सव कोल्हापूर शहरात देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. हा उत्सव 'याची देही याची डोळा' अनुभवणारे साक्षीदार इतिहास तज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोल्हापुरातील आनंद उत्सव अनुभवला आहे. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की,देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या क्षणानंतर कोल्हापुरात झालेल्या आनंदोत्सव कशा पद्धतीने साजरा केला गेला आहे.

या दिवशी कोल्हापुरातील बावडा याठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघाली होती. कोल्हापुरात लोक तल्लीन होऊन नाचत होते. यावेळी घरावरती तिरंगी झेंडे फडकवण्यात आले. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढीपाडव्याला काठी उभा करतात त्याच पद्धतीने काठीला कापड गुंडाळत झेंडा उभा केला.ज्याला कापड मिळाले त्यांनी कपड्याचा झेंडा तयार करून लावला. आणि ज्यांना कापड मिळालं नाही त्यांनी अक्षरशा कागदाचे झेंडे करून उभा केले.

पारतंत्र्यातून स्वातंत्र्यत जाण्याचा आनंद आणि जल्लोष कोल्हापुरात त्यावेळेस काही वेगळाच होता. खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही तरीही लोकांनी त्या वेळेस घराघरात गोड पदार्थ म्हणून लाडू आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. बैलगाडीतून त्यावेळेस गल्लीबोळातून मिरवणूक निघाली. झांज पथक ,लेझीम याच्या आवाजाने बावडा परिसर दुमदुमून गेला होता.

कोल्हापुरात प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिनाला जिलेबी खाल्ली जातात याविषयी त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा ट्रेंड हा मुघलांनी आणला.खरं तर लाडू आणि पेढे हा आपला खाद्यपदार्थ. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जसे लाडू पेढे वाटले गेले तसेच राजाराम महाराज यांना मुलगी झाल्यानंतर हत्तीवरून लाडू,पेढे वाटण्यात आले. म्हणूनच आपल्याकडे कंदी पेढे, नृरसिंहवाडी चे पेढे अशा अनेक पेढ्यांची नावे आहेत. कोल्हापुर गुळासाठी ओळखले जाते.आमच्या वेळी साखर नव्हती गुळ असायचा त्यामुळे गुळाचा पदार्थ म्हणजे लाडू. कोल्हापुरातील स्वातंत्र्य दिनादिवशी झालेला हा जल्लोष एक आगळा आणि वेगळा ठरला. आजही त्या काळातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्मरणात तो दिवस कायम राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com