

Massive Fire at Kolkata’s Anandalok Hospital, Patients Evacuated Safely
esakal
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात मंगळवारी सकाळी मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू झाले. रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेच्या वेळी रुग्णालयात किती रुग्ण दाखल होते, याची नेमकी संख्या अद्याप समजलेली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.