
कोलकातामधील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री कोलकात्यातील बारा बाजार परिसरातील मच्छुआ फल मंडीजवळील ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी आगीच्या घटनेबाबत माहिती दिली.