
कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेप प्रकरणामुळे आता पश्चिम बंगालमधलं वातावरण तापलं आहे. पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सत्ताधारी टीएमसीच्या विद्यार्थी शाखेचा सदस्य आहे. दरम्यान, या वादात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनरजी यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. कल्याण बॅनर्जी यांच्या विधानावर भाजपने हे खूपच लाजीरवाणं असल्याचं म्हटलंय.