शॉर्ट पँटमुळे तरुणाला स्टेट बँकेत नाकारला प्रवेश, दिलं 'हे' कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

शॉर्ट पँटमुळे तरुणाला स्टेट बँकेत नाकारला प्रवेश, दिलं 'हे' कारण

नवी दिल्ली : पोशाखामुळे स्टेट बँकेत (State Bank Of India) प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप एक व्यक्तीने केला आहे. कोलकातामध्ये (Kolkata) ही घटना घडली असून त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर बँकेने देखील त्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

हेही वाचा: रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व, राणेंच्या पॅनेलचा सुपडासाफ

आशिष असे या व्यक्तीचे नाव असून त्याने बँकेत जाताना तोकडे कपडे घातले होते. बँकेतील कर्मचार्‍यांनी त्यांना पूर्ण पँट घालून परत येण्यास सांगितले. कारण त्यांना सभ्यता अपेक्षित होती, असं त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे. "ग्राहक काय घालू शकतो आणि काय घालू शकत नाही याबद्दल काही अधिकृत धोरण आहे का?" असा प्रश्नही त्याने विचारला.

16 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून काही संबंधित व्यक्तीच्या समर्थनार्थ पुढे आले तर, काहींनी बँकेला पाठींबा दिला. SBI ने देखील त्या व्यक्तीच्या पोस्टवर टिप्पणी केली आणि स्पष्ट केले की बँकेत प्रवेश करण्यासाठी कोणतेही धोरण किंवा ड्रेस कोड नाही. त्यांनी त्याला शाखेचे नाव सांगण्यास सांगितले. त्यानंतर जॉय चक्रवर्ती यांनी त्यांच्या घरी भेट देऊन वैयक्तिकरित्या समस्येचे निराकरण केले. त्यानंतर आशिषने तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.

loading image
go to top