Land Scam : फसवणुकीची अजब तऱ्हा; टार्गेट केलेल्या माणसांना 'तो' बाई बनून भेटायचा!

फिल्मी पद्धतीने नियोजन करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Fraud crime
Fraud crimeesakal

कोलकत्तामधल्या बारासात इथं जमीन विकू इच्छिणाऱ्या महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी जाधवपूर इथल्या एका रहिवाशाला अटक करण्यात आली. अनिंद्यो चक्रवर्ती असं याचं नाव असून तो पीडितांना भेटण्यापूर्वी एखाद्या महिलेसारखा पोशाख घालत असे, जेणेकरून कोणीही त्याला ओळखू शकणार नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरासत इथल्या विकास चंद्र मोंडल याने त्याला प्लॉट बुक करण्यासाठी ५०,००० रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

Fraud crime
Trending News : कोणताही सुई धागा न लावता शिवलेले कपडे पाहिले आहेत का?

बिधाननगर आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, चक्रवर्ती याने मध्यग्राममधील भूखंड विक्रीच्या अनेक जाहिराती पोस्ट केल्या होत्या. मोंडलने जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला होता आणि एका महिलेने कॉलला उत्तर दिलं होतं. अधिकाऱ्यानं सांगितलं, “महिलेने मोंडलला सॉल्ट लेकमधील सीजे ब्लॉकला भेट देण्यास सांगितलं होतं.

मोंडल चक्रवर्ती यांना भेटले आणि त्यांना मध्यमग्राममध्ये बाजारभावापेक्षा खूपच कमी दराने जमीन देऊ केली. एका महिलेच्या वेशात असलेल्या चक्रवर्ती यांनी मोंडलला सांगितलं की, तो जमीन स्वस्तात विकण्यास तयार आहे कारण त्याला पैशांची गरज होती, असं पोलिसांनी सांगितलं. (Latest Trending News)

Fraud crime
Trending News : एक घर, १८५ सदस्य, ८४ खोल्या अन् ६५ किलो पीठाच्या चपात्या; परिवार आहे की गाव?

चक्रवर्ती यांनी मोंडलला सांगितलं की तो इतर खरेदीदारांना भेटणार होता आणि "बुकिंग रक्कम" म्हणून ५०,००० रुपये अॅडव्हान्स मागितले.“चहाच्या स्टॉलजवळ सीजे ब्लॉकमधील फुटपाथवर हा संवाद झाला. मोंडलने पैसे दिले आणि दोघांनी जमीन पाहण्यासाठी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एक तारीख निश्चित केली,”असंही पोलिसांनी पुढे सांगितलं.

मात्र, दुसऱ्या दिवशी मोंडलने क्रमांकावर फोन केला असता तो बंद होता. पुढच्या काही दिवसात त्याने अनेकदा प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी बिधाननगर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोंडलने दिलेल्या नंबरवर पोलिस फोन करत राहिले आणि एक दिवस त्याचे उत्तर आलं.

“एक अधिकारी इच्छुक खरेदीदार म्हणून उभा आहे. महिलेने त्याला सीजे ब्लॉकला भेट देण्यास सांगितले आणि मोंडलच्या उदाहरणाप्रमाणे आगाऊ रक्कम मागितली,” अधिकारी म्हणाला.इतर पोलीस कर्मचारी आणि मोंडल शेजारीच थांबले असताना अधिकारी महिलेला भेटला. मोंडल यांनी चक्रवर्तीची ओळख पटवली आणि अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com