Kolkata Case Hearing: कोलकाता हत्या प्रकरण; मुख्य आरोपी संजय रॉयला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kolkata Murder Case: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला शुक्रवारी सियालदहच्या विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Sanjay Roy
Sanjay RoyESakal
Updated on

कोलकाता डॉक्टर हत्येप्रकरणी सीबीआयने कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास तीव्र केला आहे. आज विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला झटका दिला असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने संजय रॉयच्या चौकशीनंतर अनेक खुलासे समोर आले आहेत. आरोपी संजयनेही पॉलीग्राफी चाचणीसाठी होकार दिला आहे. सीबीआयच्या पथकाने त्याच्या पॉलिग्राफी चाचणीची मागणी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com