कोप्पळ : प्रेमसंबंधातून (Love Affair) उद्भवलेल्या वादामुळे कोप्पळ शहर हादरवून टाकणारी हत्या रविवारी रात्री घडली. वॉर्ड क्र. ३ मधील मशिदीसमोर (Mosques) झालेल्या या घटनेत गविसिद्दप्पा नायक याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सादिक कोलकर याने आत्मसमर्पण केलं असून त्याच्यासह आणखी चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.