अखेर कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने आज अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले.

नवी दिल्ली  -  कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने आज अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले. हे करण्याआधी महाराष्ट्र सरकारलाही विश्‍वासात घेण्यात आले नसल्याची माहिती समजते. यामुळे काही उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने सरकारने हा तपास आपल्या हातात घेतल्याची चर्चा आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्याच्या अखत्यारित असतो, मात्र दहशतवादाशी निगडित प्रकरणे आणि त्यांचे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेता ते प्रकरण केंद्र स्वत: हातात घेऊ शकते. या अधिकाराचाच वापर करून हे प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koregaon-Bhima investigated by NIA