Kota Police Assault Viral Video : राजस्थानच्या कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे पोलिसांच्या (Police) आचारसंहितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'शिक्षणाची राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये एका पोलीस इन्स्पेक्टरने दुकानदाराला चक्क रस्त्यावर थप्पड मारलीये. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.