Crime News: आईसमोरच संपवलं आयुष्य! नवव्या मजल्यावरुन मारली उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: आईसमोरच संपवलं आयुष्य! नवव्या मजल्यावरुन मारली उडी

Viral Crime News: कोणाला कसला आणि कोणत्या गोष्टीचा केव्हा राग येईल हे काही सांगता येत नाही. त्याचबरोबर त्या रागाच्या भरात कोण काय करेल याचाही अंदाज बांधता येत नाही. रागात आयुष्य होत्याचं नव्हतं करुन टाकणारी अनेक उदाहरणं रोज पाहायला मिळतात. मात्र देशात कोचिंग सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोटा शहरात घडलेल्या त्या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

कोट्यामधून आणखी एक आत्महत्येची बातमी समोर आली आहे. जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस करावा लागणारा संघर्ष, एवढं करुनही अपयश आलं तर मग ते पचवला न आल्यानं येणारं नैराश्य, याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होताना दिसतो आहे. त्यामुळे की काय ते टोकाचा मार्ग स्विकारताना दिसत आहे. कोट्यामध्ये शिकण्यासाठी आलेल्या कोलकात्ताच्या एका विद्यार्थ्यांनं आपल्या आईसमोरच नवव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या विद्यार्थ्यानं निराशाग्रस्त झाल्यानं आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कोटामधील राजीव गांधी परिसरात राहणाऱ्या त्या युवकानं उचलेल्या या पावलामुळे अनेकांनी खेद व्यक्त केला आहे. खाली पडल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असं सांगण्यात आलं आहे की, तो विद्यार्थी कोट्यामध्ये राहून कोचिंग क्लास करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता.

हेही वाचा: Viral Video: हत्तीचा नाद केला, वाघ पळून गेला!

स्वर्णा शांतनु असे त्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथे राहणारा आहे. गेल्या वर्षापासून तो अकरावीचे क्लास करत होता. त्याचे वडील इंजिनियर आहेत.

हेही वाचा: Sangli viral video: लाच देऊ शकत नाही म्हणून अधिकाऱ्यांसमोर कपडेच काढले 

टॅग्स :crimeviralkota factory