कोविड नावामुळं भारतीय चर्चेत, परदेशात ठरतोय मनोरंजनाचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड नावामुळं भारतीय चर्चेत, परदेशात ठरतोय मनोरंजनाचा विषय

'माझं नाव कोविड, मी व्हायरस नाही; हनुमान चालिसातून घेतलंय नाव', गुगलही फिरकी घेतंय म्हणत बर्थडे केकचा किस्सा आणि नावाचा अर्थही कोविड कपूरने सांगितला.

कोविड नावामुळं भारतीय चर्चेत, परदेशात ठरतोय मनोरंजनाचा विषय

दिल्ली - गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून जगाला कोरोनाने (Corona) वेठीस धरलं आहे. अनेक देशांनी कोरोनाचं भयावह असं रुप पाहिलं. भारतातही दुसरी लाट ओसरल्यानंर आता तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. कोरोनाचे Covid 19 असंही नाव आहे. दरम्यान, भारतात कोविड कपूर नावाची व्यक्ती असून ते होलीडिफायचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी आपल्या कोविड नावामुळे लोक कसे खूश आहेत ते सांगितलं. त्यांनी ट्विटरवरून काही किस्सेही शेअर केले आहेत.

कोविड कपूर यांनी ट्विटरवर म्हटलं की, 'कोरोनाच्या साथीनंतर पहिल्यांदा भारताबाहेर गेलो आणि माझ्या नावामुळे लोकांचे मनोरंजन झाले. भविष्यात परदेश दौरे खूपच मजेशीर असतील.' माझ्या Kovid नावाचा अर्थ प्रत्यक्षात बुद्धिमान असा किंवा जो शिकला आहे असा आहे. हा शब्द हनुमान चालिसामधून घेतल्याचंही कोविड कपूर यांनी सांगितलं.

कोविड कपूर यांनी त्यांच्या बायोमध्ये असंही लिहिलं होतं की, 'माझं नाव कोविड आहे आणि मी व्हायरस नाही, शाहरुख खानचा डायलॉग 'मेरा नाम खान है और मै आतंकवादी नही' आठवतो.' आपल्या नावाच्या उच्चारात Kovid या शब्दात शेवटी असलेलं D हे सायलंट असून ते कोविड असं नाही तर कोविद असं उच्चारायला हवं असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, कोविड यांनी काही फोटोही शेअर ट्विटरवरून शेअर केले आहेत.

हेही वाचा: देशात १ लाख १७ हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर

वाढदिवसाच्या केकवरसुद्धा एकदा बेकरीवाल्यानं नावाचं स्पेलिंग Covid असं लिहिलं होतं. त्याचाही किस्सा कोविड यांनी सांगितला. ते म्हणाले की, मित्रांनी बर्थडेला केक ऑर्डर केला तेव्हा जे नाव दिलं होतं ते चुकलंय असं बेकरीवाल्याला वाटलं. त्याने Kovid ऐवजी ते Covid असं लिहून केक पाठवून दिला. एवढंच काय गुगलवर जरी Kovid असं टाकलं तरी ते परत सजेशनमध्ये सांगतं की तुम्हाला Covid असं म्हणायचं आहे का?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronaviruscovid 19
loading image
go to top