esakal | IAF: महाराष्ट्राचे सुपुत्र व्ही.आर. चौधरी हवाई दलाच्या प्रमुखपदी
sakal

बोलून बातमी शोधा

Air Chief Marshal V.R. Chaudhari

महाराष्ट्राचे सुपुत्र व्ही.आर. चौधरी हवाई दलाच्या प्रमुखपदी

sakal_logo
By
सुधीर काकडे

हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया हे आज निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी महाराष्ट्राचे सुपूत्र व्ही. आर. चौधरी यांनी हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्विकारला आहे. यापुर्वी एअर मार्शल असलेल्या व्ही. आर. चौधरी (VR Chaudhari) यांना देशाचे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच घेतला होता. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्विकारला होता.

हेही वाचा: दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार

विवेक राम चौधरी हे यापुर्वी हे भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडर इन चिफ होते. या पदावर असताना त्यांनी कठीण समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील लडाख आणि इतर भागांमध्ये देशाचे संरक्षण करण्याचे काम केले. हवाई दलाच्या लढाऊ विभागामध्ये २९ डिसेंबर १९८२ रोजी एअर मार्शल चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता.

विशेष म्हणजे ते महाराष्ट्रातील नांदेडचे सुपूत्र आहेत. सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हवाई दलाच्या वेगवेगळ्या विभागांत काम केले आहे. तसेच आपल्या कार्यकाळात त्यांनी मिग-२१, मिग एमएफ आणि सुखोई एमकेआय या ही लढाऊ विमानं उडवत ३,८०० पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव घेतला आहे.

loading image
go to top