दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार

दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार
Updated on: 
Summary

पाकिस्तानच्या नौशेरा जिल्ह्यातील पब्बी इथं ३ ऑक्टोबरपासून एससीओ RATS च्या नेतृत्वाखाली दहशतवाद विरोधी एक्जरसाईजचे आयोजन करण्यात आले आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनमध्ये भाग घेण्यासाठी भारताची तीन सदस्यांची टीम पुढच्या आठवड्यात पाकिस्तानला जाणार आहे. पाकिस्तानच्या नौशेरा जिल्ह्यातील पब्बी इथं ३ ऑक्टोबरपासून एससीओ RATS च्या नेतृत्वाखाली दहशतवाद विरोधी एक्जरसाईजचे आयोजन करण्यात आले आहे. एससीओ सदस्य देशांमध्ये दहशतवादाविरोधात सहकार्य वाढीस लागावं हा यामागचा उद्देश आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, यामध्ये सहभागी झाल्यानं पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याच्या भारताचे आऱोप कमी होणार नाहीत. भारताच्या उपस्थितीत सुरक्षेशी संबंधित मुद्दे, विशेषत: अफगाणिस्तानबाबत भूमिकेच्या दृष्टीने याकडे पाहिले जात आहे. रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि ४ मध्य आशियाई देशांच्या सदस्यांसह इराणसुद्धा एससीओमध्ये येण्याने अफगाणिस्तान प्रश्नावर महत्त्वाची चर्चा होऊ शकते.

दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार
पश्चिम बंगाल पोटनिवडणूक : ममतांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ताश्कंदमध्ये झालेल्या RATS च्या बैठकीनंतर या वर्षी मार्च महिन्यात एक्सरसाइजची घोषणा झाली. यात सहभागी होणार असल्याचं भारताने सर्वात शेवटी सांगितलं. एससीओ प्रोटोकॉल अंतर्गत पाकिस्तानने भारतासह सर्व सदस्यांना या अभ्यासासाठी निमंत्रण दिलं होतं. यात सैनिक सहभागी होणार नसून दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांना शोधणं आणि त्यांना रोखण्याचा उद्देश आहे. यात भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयातील अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Temple of Goddess Kali on the country's first cable-stayed railway bridge
Indian Railways Offline Ticket Insurance
Husband Saurabh Rajput was brutally murdered and his body stuffed in a drum
Marathi News Esakal
www.esakal.com