esakal | कोरोनाचा प्रकोप : वेळेआधीच कुंभमेळा आटोपणार ? निरंजनी आखाड्याची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संकटादरम्यान यावेळी कुंभमेळ्यातील आयोजन कालावधीत कपात करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रकोप : वेळेआधीच कुंभमेळा आटोपणार ?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हरिद्वार- कुंभमेळ्यावर कोरोनाचा प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि साधू पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता आखाड्यांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयोजनातून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यातील कोरोना महामारीचा धोका पाहता प्रमुख 13 आखाड्यांपैकी दोन निरंजनी आखाडा आणि तपोनिधी श्री आनंद आखाडाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही आखाड्यांनी कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीचे कारण देत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही आखाडे 17 एप्रिलला कुंभमेळ्याला निरोप देतील.

निरंजनी आखाड्याकडून कुंभमेळ्यातून जाण्याची तयारी

निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटले की, कुंभमेळ्यात कोविड-19 ची बिघडती स्थिती पाहता आमच्या दृष्टीने या आयोजनाचे समापन झाले आहे. मुख्य शाही स्नान संपुष्टात आला आहे. आमच्या आखाड्यातील अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. मेळ्यात अनेक साधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्यावर ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. तसेच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कपिल देव यांचे उपचारादरम्यान एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

हेही वाचा: निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन

गुरुवारी उत्तराखंडमध्ये आढळले 2220 नवे रुग्ण

गुरुवारी उत्तराखंडमध्ये कोरोनाचे 2220 नवे रुग्ण आढळून आले. राज्यात एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. कोरोना संकटादरम्यान यावेळी कुंभमेळ्यातील आयोजन कालावधीत कपात करण्यात आली आहे. यावेळी आयोजन 1 एप्रिल ते 30 एप्रिलदरम्यान होत आहे. इतरवेळी 12 वर्षांच्या अंतराने होणारा कुंभमेळा सुमारे 4 महिन्यांपर्यंत सुरु असतो. हरिद्वार कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: मे अखेरीस भारतात येणार स्फुटनिक व्ही लस; लवकरच भारतातही होणार उत्पादन

दरम्यान, गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याचप्रमाणे यंदा कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सरळसरळ धुडकावून लावले होते. त्यांनी म्हटलं होतं की, कुंभमेळा आणि मरकज यांनी तुलना करू नये. कुंभमेळा एका विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत होत आहे. पण मरकज हे एका बंद इमारतीत झालं होतं, असं रावत म्हणाले होते.

loading image