esakal | कुंभ मेळ्यात कोरोना प्रोटोकॉल पायदळी; 102 जणांना लागण

बोलून बातमी शोधा

corona kumbh

कुंभ मेळा पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानात 31 लाखांहून अधिक भक्तांनी भाग घेतला होता. 

कुंभ मेळ्यात कोरोना प्रोटोकॉल पायदळी; 102 जणांना लागण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

हरिद्वार - देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रौद्र रुप धारण करत आहे. कोरोनाचं संकट असतानाही हरिद्वार कुंभ मेळ्यामध्ये मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे प्रोटोकॉल पायदळी तुडवले जात आहेत. लाखोंच्या संख्येनं भक्त या कुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत. एवढंच नाही तर उत्तराखंड सरकारला थर्मल स्क्रीनिंग आणि लोकांनी मास्क घालावा यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या दोन्ही गोष्टी करणं प्रशासनाच्या हाताबाहेर गेलं आहे. दरम्यान, उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी असा दावा केला की, शाही स्नानावेळी राज्य सरकारने केंद्राकडून जारी केलेल्या कोरोना गाइडलाइन्सचं पालन केलं. 

कुंभ मेळा पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानात 31 लाखांहून अधिक भक्तांनी भाग घेतला होता. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारीरी 11 .30 वाजल्यापासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 18 हजार 169 भक्तांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी 102 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

कुंभ मेळ्यात अनेक ठिकाणी प्रशासनाची दमछाक झाल्याचं आणि थर्मल स्क्रीनिंगच्या व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं दिसलं. सीसीटीव्ही लावले असतानाही भाविकांकडून मास्क घालण्याकडे दुर्लक्ष झालं आहे. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशातून येणाऱ्या एका श्रद्धाळुने असं सांगितलं की, उत्तराखंड यूपी सीमेवर चेक पॉइंटवर स्क्रिनिंग केलं गेलं. तसंच कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे की नाही याचीही तपासणी केली. मात्र कुंभ मेळ्यात असं काही झालं नाही. इथं ना थर्मल स्क्रिनिंग झालं ना कोरोना टेस्ट रिपोर्ट चेक केला. 

हे वाचा - 'कोरोनाबाबत लोकांचा हलगर्जीपणा भोवला'; AIIMS चे प्रमुखांनी व्यक्ती केली भीती

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाबद्दल सांगताना म्हटलं की, कोरोनाच्या नियमावलीचं पूर्ण पालन होईल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तराखंड पोलिसांसाठी हे मोठं आव्हान आहे. कुंभ मेळ्यात जितके लोक सहभागी होतील अशी अपेक्षा होती त्याच्या 50 टक्केच लोक कोरोनामुळे आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाही स्नानाच्या दिवशी 13 आखाड्यातील साधू गंगा स्नानासाठी आले होते. यावेळी कुंभ मेळा प्रशासनाने कडक सुरक्षेची व्यवस्था केली होती. या आखाड्यामध्ये 7 सन्याशी, 3 वैरागी आणि 3 वैष्णव आखाड्यांचा समावेश आहे. निरंजनी आखाड्यातील संतांनी सर्वात आधी शाही स्नान केलं. तर निर्मल आखाड्यातील साधूंनी सर्वात शेवटी स्नान केलं. आखाड्यातील साधू संतांचे स्नान झाल्यानंतर इतर भाविकांना ब्रह्मकुंड स्नानासाठी खुले करण्यात आले.