

New Cheetah Cubs Born in Kuno National Park
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात भारताच्या 'प्रोजेक्ट चित्ता' मोहिमेला आणखी एक यश मिळाले आहे. बोत्सवाना येथून भारतात आणलेल्या अडीच वर्षांच्या 'KOMG 3' या मादी चित्त्याने चार निरोगी बछड्यांना जन्म दिला आहे. या नव्या जन्मांमुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ६२ वर पोहोचली असून, त्यापैकी ४३ चित्ते भारतात जन्मलेले आहेत.