आता हे कुणी केलं? सचिनचा VIDEO शेअर करून कुणाल कामराची मोदी सरकारवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिनचा VIDEO शेअर करून कुणाल कामराची मोदी सरकारवर टीका

सचिनचा VIDEO शेअर करून कुणाल कामराची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली - कॉमेडियन कुणाल कामरा याने सचिनचा एक जुना व्हिडिओ शेअर करून मोदी सरकारला चिमटा काढला आहे. याआधीही देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून त्याने ट्रेनचा एक व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. विशेष म्हणजे दोन्ही व्हिडिओ शेअर करताना कुणाल कामराने आता हे कुणी केलं असा कॅप्शन दिला आहे.

देशातील पेट्रोलच्या किंमती पुन्हा एकदा वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल शंभर रुपयांपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. यावरून कुणाल कामराने सचिनच्या कसोटी शतकाचा एक एडिटेड व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.

हेही वाचा: स्वॅग! साडी नेसून हॉर्स रायडिंग; पाहा अफलातून व्हिडीओ

व्हिडिओमध्ये सचिन 99 धावांवर खेळत असतानाच संसदेतील काही फूटेज दाखवण्यात आलं आहे. सचिनच्या शतकाची सर्वांना उत्सुकता आहे असंच काहीस त्यात दाखवलं असून जेव्हा सचिन शतकी धाव घेतो तेव्हा संसदेत सर्व नेते टाळ्या वाजवत असतानाचे फुटेज जोडलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही टाळ्या वाजवत असल्याचं दिसतं. फुटेजमध्ये पेट्रोलचा दर 99 चा शंभर झाल्याचं दर्शवण्यात आलं आहे.

याआधी कुणाल कामराने वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओसरलेली दुसरी लाट, त्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग यावर टीका करणारा व्हिडिओ शेअर केला होता.

Web Title: Kunal Kamra Again Share Video Target Modi Government Over Patrol Diesel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top