Cheetah Project : नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्ते भारतात दाखल होणार, Kuno Park स्वागतासाठी सज्ज

भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला.
Cheetah Project India
Cheetah Project Indiaesakal
Summary

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांच्या या गटात सात नर आणि पाच मादी चित्ता आहेत.

Cheetah Project India : मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात (Sheopur in Madhya Pradesh) असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आज (शनिवार) आणखी 12 चित्त्यांची (Cheetah) भर पडणार आहे.

त्यामुळं उद्यानातील चित्त्यांची संख्या 20 होणार आहे. या चित्त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना धोका कमी असल्याचं एका अभ्यासात समोर आलंय. चित्ता प्रकल्पाचे प्रमुख एसपी यादव म्हणाले, ग्लोबमास्टर सी-17 विमानानं 12 चित्तांसह भारतात उड्डाण केलं आहे. सकाळी 10 : 30 वाजता या चित्त्यांचं ग्वाल्हेर विमानतळावर आगमन होईल. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री शिवराज चौहान या कार्यक्रमात सहभागी होतील.

Cheetah Project India
Nathuram Godse : भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देश बनवायचाय; उपमुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्ला

12 चित्त्यांच्या गटात 7 नर आणि पाच मादी

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांच्या या गटात सात नर आणि पाच मादी चित्ता आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला कुनो नॅशनल पार्कमध्ये लाकडी पिंजऱ्यांचे दरवाजे उघडून नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचं स्वागत केलं होतं.

Cheetah Project India
Hasan Mushrif : मोठी बातमी! NCP नेते हसन मुश्रीफ पुन्हा अडचणीत; तीन माजी संचालकांची ED कडून चौकशी सुरू

या चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानानं आज सकाळी ग्वाल्हेरला आणलं जाणार आहे. भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com