esakal | मुलगा झाला वाटले लाडू अन् निघाला कोरोना पॉझिटिव्ह...
sakal

बोलून बातमी शोधा

lab technician gave laddu vilages after boy born corona positive at rajasthan

एकाने मुलगा झाला म्हणून परिसरातील नागरिकांना लाडू वाटले. पण, त्याची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मुलगा झाला वाटले लाडू अन् निघाला कोरोना पॉझिटिव्ह...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): एकाने मुलगा झाला म्हणून परिसरातील नागरिकांना लाडू वाटले. पण, त्याची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गुड न्यूज : देशातील 'ही' तीन राज्ये कोरोनामुक्त...

दौसा जिल्ह्यातील एक व्यक्ती एका रुग्णालयाच्या लॅबमध्ये काम करत आहे. त्याची गर्भवती पत्नीही याच सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती होती. तिला मुलगा झाला. काही दिवसांनी त्याच्या पत्नीला घरी सोडण्यात आले. त्याने मुलगा झाला म्हणून आनंदात परिसरातील नागरिकांना लाडू वाटले. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱयांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या कर्मचाऱाला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे.

कोरोनामुळे डॉक्टर दाम्पत्य झाले भावूक अन् लिहीले मृत्यूपत्र...

दरम्यान, संबंधित व्यक्तीने परिसरात लाडू वाटल्याने प्रशासनाचीही धापवळ उडाली असून, नागरिकांवर लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनदरम्यान नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे आवाहन केले आहे.