esakal | कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांसाठी खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी

कर्मचाऱ्यांसाठी खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Labour Shramik Card/e-SHRAM Portal Registration Process : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने नुकतेच e-SHRAM (ई-श्रम) पोर्टल लाँच केलं आहे. या संकेतस्थळाद्वारे असंघटित मजूरांना दोन लाख रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. असंघटित क्षेत्रामधील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत (PMSBY) अपघात विमा दिला जाणार आहे. हा विमा एक वर्षांसाठी असेल. अपघाती मृत्यु आणि कायमस्वरुपीचं अपंगत्व अशा परिस्थितीत दोन लाख रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. तसेच आंशिक अपंगत्वामध्ये एक लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलेय.

विमा संरक्षणाशिवाय नोंदणीकृत कर्मचारी e-SHRAM पोर्टलद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक सुरक्षेचाही लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या योजनेनुसार, जवळपास 38 कोटी असंघटित मजूर e-SHRAM पोर्टलवर नोंदणी करतील. यामध्ये प्रवासी मजूर, रोजंदारीवर काम करणारा कर्मचारी, घरकामगार आणि इतर मजूरांचा समावेश असेल. e-SHRAM पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर 12 क्रमांकाचं स्पेशल श्रम कार्ड मिळेल.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

कशी कराल नोंदणी?

e-SHRAM पोर्टलवर नोंदणी करणं खूप सोपं आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अतिशय सोप्या स्टेप्सद्वारे नोंदणी करु शकता.

सर्वात आधी e-SHRAM पोर्टलच्या अधिकृत https://eshram.gov.in/ या संकेतस्थळावर जा..

“रजिस्टर ऑन ई-श्रम” हा पर्याय निवडा.

त्यानंतर तिथे ‘सेल्फ रजिस्ट्रेशन ब्लॉक’ हा पर्याय मिळेल. ज्यामध्ये आधार क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर कॅप्चा कोड आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.

तुम्ही टाकलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. त्याने तुमची माहिती वेरिफाय करा.

नवीन पेज उघडेल. तिथे सांगितलेली माहिती भरा.

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. प्रक्रिया पूर्ण होईल.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

हेल्पलाइन नंबर -

केंद्र सरकारने मजूरांसाठी 14434 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे.

नोंदणीसाठी काय महत्वाचं आहे?

आधार कार्ड, आधारशी लिंक असणारा अॅक्टिव मोबाईल क्रमांक, बँक डिटेल्स आणि नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचं वय 16 ते 59 दरम्यान असावे.

loading image
go to top