Political Novels : एखादी तरी राजकीय कादंबरी सांगा? मराठी साहित्यातील राजकीय लेखनाच्या अभावाविषयी परिसंवादात खंत
Marathi Literature Conference : दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातील 'राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब' विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये मराठी साहित्यात राजकीय कादंबऱ्यांच्या अभावावर विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी खंत व्यक्त केली.
नवी दिल्ली : नव्या शतकाला २५ वर्षे झाली. पण या वर्षांमध्ये मराठी साहित्यात नाव घेण्याजोगी एक तरी राजकीय कादंबरी प्रसिद्ध झाली आहे काय? असा प्रश्न विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी उपस्थित केला.