
नवी दिल्लीः लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण मिळालं. रस्त्यावरील आंदोलन आणि जाळपोळीमुळे तब्बल चार जणांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर या संघर्षात ४० पोलिस अधिकाऱ्यांसह ८० लोक जखमी झाले आहेत. लडाखमध्ये प्रमुख धर्म बौध्द आहे. बौद्धांची लोकसंख्या तब्बल ७७ टक्के इतकी आहे.