esakal | लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकाच दिवशी दोन मोठे झटके; वाचा काय झालं
sakal

बोलून बातमी शोधा

Ladu Prasad Yadavs party rjd suffered two major setbacks on the same day

पक्षाचे वरिष्ठ नेते व लालूप्रसाद यादव यांच्याजवळचे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्या आधीच ‘आरजेडी’च्या पाच सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलमध्ये (जेडीयू) प्रवेश केला आहे. 

लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकाच दिवशी दोन मोठे झटके; वाचा काय झालं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा- बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला (आरजेडी) मंगळवारी जोरदार झटका बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते व लालूप्रसाद यादव यांच्याजवळचे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्या आधीच ‘आरजेडी’च्या पाच सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलमध्ये (जेडीयू) प्रवेश केला आहे. 

CBSE चा निकाल कधी? वाचा सविस्तर...
बिहारमध्ये पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘आरजेडी’चे पाच सदस्यांनी पक्षातून बाहेर पडून ‘जेडीयू’त प्रवेश करत असल्याची घोषणा केली. या पक्षांतराबरोबरच माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचे स्थानही धोक्यात आले आहे. यानंतर काही वेळातच रघुवंशप्रसाद सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला दुसरा धक्का दिला.

इंग्रजांनी एका भारतीयाचं नाव गलवान खोऱ्याला का दिलं?
बिहारमधील बाहुबली नेता रामासिंह यांना ‘आरजेडी’त प्रवेश देण्यावरून रघुवंशप्रसाद व अन्य वरिष्ठ नेते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. रामासिंह यांच्याकडून रघुवंशप्रसाद यांना हार पत्करावी लागली होती. त्यांच्या समवेत अनेक मोठे नेतेही यापुढील काळात पक्षाची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रघुवंशप्रसाद हे सध्या ‘एम्स’मध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

...तरी पण लग्न केले; दुसऱयाच दिवशी मृत्यू
बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. तर विधान परिषद 75 सदस्यांची आहे. आरजेडीकडे विधानपरिषदेत एकूण 8 सदस्य होते. मात्र, आता 5 आमदारांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने विधान परिषदेत पक्षाचे केवळ 3 सदस्य राहिले आहेत. 2015 च्या निवडणुकीत निवडून आलेला राष्ट्रीय जनता दल हा विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष होता. 

जेडीयूने पक्षात आलेल्या नवीन आमदारांचे स्वागत केले आहे.  पक्षात आलेल्या संदस्यांचे कुटुबांत स्वागत करतो असं संयुक्त जनता दलाचे नेते राजीव राजन सिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकाच दिवशी दोन मोठे झटके बसले आहेत.