esakal | महिला सरपंचाची 11 कोटींची संपत्ती, भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर छाप्यात उघड
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सरपंचाची 11 कोटींची संपत्ती, भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर छाप्यात उघड

महिला सरपंचाची 11 कोटींची संपत्ती, भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर छाप्यात उघड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महिला सरपंचाच्या घरी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात संबंधित महिलेच्या नावावर ११ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील बैजनाथ गावच्या महिला सरपंचाची संपत्ती पाहून अधिकारी आणि कर्मचारीही अवाक् झाले. लोकायुक्तांनी कारवाई करताना ११ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं उघड केलं आहे.

गावच्या महिला सरपंच सुधा सिंह यांचा अलिशान बंगला असून कोट्यवधी रुपये किंमतीची वाहने आहेत. तसंच सोने चांदीचे दागिने, जमीन यासह क्रशर, जेसीबी यांसारखी मशिन्ससुद्धा आहेत. या सगळ्या मालमत्तेची अंदाजे किंमत ११ कोटी रुपयांहून जास्त आहे.

सुधा सिंह यांनी एक एकर आवारात अलिशान बंगला बांधला असून त्यात स्विमिंग पूलसुद्धा तयार करण्यात आला आहे. लोकायुक्त या प्रकरणाची चौकशी करत असून आतापर्यंत २० हून अधिक जमिनी, वाहने, अलिशना बंगला, क्रशर, सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्तांनी न्यायालयातून सर्च वॉरंट घेतलं होतं. यामध्ये आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. यात आणखी काही संपत्ती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; केरळमध्ये 30 हजार नवे रुग्ण

महिला सरपंचांच्या दोन ठिकाणांवर छापा मारण्यात आला. बैजनाथ गावात आणि शारदापुरम कॉलनीमध्ये एकाच वेळी टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळून आली. यामध्ये दोन घरांची किंमत अंदाजे प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याचं म्हटलं आहे. तसंच मोठी ३० वाहने आणि भूखंड आणि रोख रक्कम मिळून ११ कोटींहून अधिक किंमत आहे. लोकायुक्तांनी त्यांच्या टीमसह दोन्ही ठिकाणी छापा टाकून संपत्ती जप्त केली आहे.

loading image
go to top