esakal | "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Mishra Teni

"शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांनी कबूल केले आहे की, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये ज्या वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले गेले ते वाहन आपलेच होते. अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र यांनी आपल्या वाहनाने शेतकऱ्यांना चिकडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. तर लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्र यांचे नाव पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये देखील आढळले आहे.

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांना चिरडणारे ते वाहन आपलेच होते असे अजय मिश्र यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले आहे. "काही कार्यकर्ते हे वाहन घेऊन जात होते. आपला मुलगा त्यावेळी वाहनात नव्हता, त्यावेळी तो दुसऱ्या ठिकाणी होता. सकाळी अकरावाजेपासून ते संध्याकाळपर्यंत तो दुसऱ्या कार्यक्रमात होता. तिथे हजारो लोक होते. तसे फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्र कार्यक्रमात होते असे प्रतिज्ञापत्र देण्यास तयार आहेत." अशी माहिती केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी दिली आहे.

हेही वाचा: Lakhimpur: "मोनू मिश्रने मित्रावर गोळी झाडली", जखमी शेतकऱ्याचा दावा

लखीमपूरमध्ये झालेल्यया हिंसाचारात जखमी झालेल्या शेतकऱ्याने केंद्रीयमंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मोनू मिश्र यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी मोनु मिश्रने आपल्या सहकाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडली, तर आशिष मिश्र हे त्यावेळी गाडीतून उतरुन पळताना आपण पाहिल्याचे जखमी आंदोलक शमशेर सिंग यांनी सांगितले आहे.

loading image
go to top