esakal | Lakhimpur: "मोनू मिश्रने मित्रावर गोळी झाडली", जखमी शेतकऱ्याचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri Violence

Lakhimpur: "मोनू मिश्रने मित्रावर गोळी झाडली", जखमी शेतकऱ्याचा दावा

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांसह ८ लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य काही जण जखमी झाले आहेत. देशातील सर्व विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने अंगावर गाडी घालून चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यातच आता या प्रकरणात जखमी झालेल्या एका शेतकऱ्याने धक्कादायक माहिती दिली आहे.

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या शेतकऱ्याने केंद्रीयमंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मोनु मिश्र यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी मोनु मिश्रने आपल्या सहकाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडली, तर आशिष मिश्र हे त्यावेळी गाडीतून उतरुन पळताना आपण पाहिल्याचे जखमी आंदोलक शमशेर सिंग यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री भूपेश बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत; पाहा व्हिडिओ

“मोठ्या गर्दीमुळे तो (आशिष मिश्रा) कारमधून उतरला आणि त्यानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मोनू मिश्राच्या हातात पिस्तूल होतं. त्यानं गोळीबार केला ज्यामुळे माझ्या एका मित्राचा कपाळावर गोळी लागून मृत्यू झाला, ” असे शमशेर सिंह या जखमी शेतकऱ्याने सांगितले.

लखीमपूरचे सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी कुमार यांनी गोळीबार झाल्याचा दावा फेटाळून लावत, जर खरोखरच गोळीबारामुळे काही झालं असतं तर शवविच्छेदन अहवालातून ते समोर आलं असतं असं सांगितंल आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर खेरी दौऱ्याच्या अगोदर शेतकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी हा हिंसाचार झाला आहे.

हेही वाचा: प्रियांका गांधींची अटक बेकायदेशीर आणि लाजीरवाणी - चिदंबरम

loading image
go to top