'वरिष्ठ पदावरच्या नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे...', वरुण गांधींचं मोदींना पत्र | Varun gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varun gandhi

'नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे...', वरुण गांधींचं मोदींना पत्र

sakal_logo
By
दीनानाथ परब

लखनऊ: लखीमपूर खेरी हिंसाचाराची (Lakhimpur Kehri violence)घटना आपल्या लोकशाहीवर कलंक (Blemish) आहे, असं भारतीय जनता पार्टीचे खासदार वरुण गांधी (Bjp varun gandhi) यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणात ज्या केंद्रीय मंत्र्याचं नाव आलं, त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन (Farmer issue) वरुण गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. शनिवारी टि्वटरवरुन त्यांनी ही माहिती दिली.

तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. राजकीय हेतुने प्रेरित आणि शेतकऱ्यांविरोधात नोंदवलेले खोटे एफआयआर रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे. "वरिष्ठ पदावर बसलेल्या अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केली. तीन ऑक्टोबरला लखीमपूर खेरीमध्ये पाच शेतकरी बंधुंना गाडीखाली चिरडण्यात आलं. ही घटना आपल्या लोकशाहीसाठी कलंक आहे" असे वरुण गांधी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: नवविवाहित काकी पुतण्यासोबत पळाली, काकाची पोलीस ठाण्यात धाव

या घटनेशी संबंध असलेल्या केंद्रीय मंत्र्याविरोधात योग्य आणि कठोर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे, तरच निष्पक्ष चौकशी होऊ शकते असे वरुण गांधींनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तीन ऑक्टोबरला उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकरी, दोन भाजपा कार्यकर्ते, एक ड्रायव्हर आणि एका स्थानिक पत्रकाराचा समावेश होता.

loading image
go to top