नवविवाहित काकी पुतण्यासोबत पळाली, काकाची पोलीस ठाण्यात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

love

नवविवाहित काकी पुतण्यासोबत पळाली, काकाची पोलीस ठाण्यात धाव

sakal_logo
By
दीनानाथ परब

जयपूर: प्रेमाला वयाचं (Love affair) बंधन नसतं, असं म्हणतात. काहीजणांना प्रेमात पडल्यानंतर वयाबरोबर नात्याचाही विसर पडतो. प्रेमाला नात्याचं भान उरलं नाही, तर कुटुंब मोडायला वेळ लागत नाही. अशीच चक्रावून टाकणारी एक घटना राजस्थान भरतपूरमध्ये (Rajasthan Bharatpur) घडली आहे. पुतण्या चक्क आपल्या काकीच्या प्रेमात पडला. काकी आणि पुतण्या दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की, एकत्र राहण्यासाठी दोघे घरातून पळून गेले.

हा प्रकार समजल्यानंतर आरोपीच्या काकांनी पोलीस स्टेशन गाठून पुतण्याविरोधात पत्नीला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली आहे. नात्याला कलंक लावणारी काकी-पुतण्याची ही प्रेमकथा भारतपूरच्या मथुर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किशनपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या काकाचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होत.

हेही वाचा: शिवसेनेने सुनील शिंदेंना का संधी दिली? संजय राऊतांनी सांगितलं कारण...

२४ वर्षाचा पुतण्या आणि १९ वर्षाच्या काकीमध्ये कधी प्रेमसंबंध सुरु झाले, हे कोणालाच कळलं नाही. एकत्र राहता यावं, यासाठी १६ ऑक्टोबरच्या रात्री पुतण्याने काकीला राहत्या घरातून पळवून नेलं. कुटुंबीयांकडून आता दोघांचा शोध सुरु आहे.१६ ऑक्टोबरच्या रात्री आपली पत्नी पुतण्यासोबत पळून गेली असे काकाने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. न्यूज एनसीआर वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: 'तुम्ही इथून निघून जा'; बिग बी स्पर्धकाला असं का म्हणाले?

दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आपली पत्नी आणि पुतण्यामध्ये बऱ्याच काळपासून प्रेमसंबंध सुरु होते. मी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण याचा दोघांवर काही परिणाम झाला नाही. अखेर परिस्थितीचा फायदा उचलून दोघेही घरातून पळून गेले. या प्रकरणात आजीनेही नातवाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नातू सूनेसोबत पळाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

loading image
go to top