esakal | Lakhimpur: प्रियांका गांधींची अटक बेकायदेशीर आणि लाजीरवाणी - चिदंबरम
sakal

बोलून बातमी शोधा

P-Chidambaram

प्रियांका गांधींची अटक बेकायदेशीर आणि लाजीरवाणी - चिदंबरम

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी मोठी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठी घटना घडली. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झालांय. याच प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रियंका यांना कायदेशीर बाबींचे पालन न करता ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनीही आता या घटनेचा निषेध केला.

लखीमपूर प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका यांना ताब्यात घेतलं. प्रियंका गांधी यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांकडून केला जातोय. पी. चिदंबरम यांनीही आता प्रियांका गांधींवर आरोप केला आहे. प्रियंका गांधींवर झालेली अटकेची कारवाई पुर्णपणे बेकायदेशीर आणि लज्जास्पद आहे. त्यांना सुर्योदयापूर्वीच रात्री ४:30 वाजता पुरूष अधिकाऱ्यांकडून अटक झाली. तसंच त्यांना अजूनही न्यायालयात हजर करण्यात आलेलं नाही. असे चिदंबरम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी तिथे गेल्या असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात एसएचओ हरगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top