esakal | काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक | Lakhimpur Kheri
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

नोएडा: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka gandhi) यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) येथे जाण्यासाठी मनाई आदेश झुगारल्याबद्दल (prohibitory orders) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. कालही लखीमपूर खेरी येथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियंका गांधी वड्रा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (up police) ताब्यात घेतले होते.(सविस्तर वृत्त लवकरच)

प्रियंका गांधी यांना लखनऊ येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पण त्या तिथून निसटल्या आणि काँग्रेस नेत्यांसोबत लखीमपूर खेरी येथे जाण्यासाठी निघाल्या. लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार शेतकरी आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लखीमपूर खेरी येथे कलम १४४ अंतर्गत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा: आईच्या मित्राकडून विश्वासघात, १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

पोलीस प्रियका गांधी यांचा शोध घेत होते. अखेर पाच तासांनी त्या आणि अन्य काँग्रेस नेते हरगाव येथे असल्याचे समजले. त्यांना तिथेच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका यांना सीतापूरमधील पीएसी गेस्ट हाऊसवर ठेवण्यात आले आहे. हे गेस्ट हाऊस तात्पुरते जेलमध्ये बदलण्यात आले आहे.

हेही वाचा: हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा

काल प्रियंका गांधींनी पोलिसांना सुनावलं होतं

सोमवारी पहाटे प्रियंका गांधी लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागाकडे निघाल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं. त्यांना ताब्यात घेतलं होतं. दाखवा, वॉरंट नसेल तर तुम्हाला मला रोखण्याचा काहीही अधिकार नाही" असे प्रियंका गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितले होते. "तुम्ही मला रोखताय पण आधी कायदेशीर बाबी पूर्ण करा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही लोकांना मारु शकता, शेतकऱ्यांना चिरडू शकता, आमच्या बरोबरही असंच वागणार" असे संतप्त झालेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.

loading image
go to top