esakal | हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा
sakal

बोलून बातमी शोधा

हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा

हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: माणसांप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा प्रणय रंगत असतो. प्राणी सुद्धा प्रणयातून आपल्या संवेदना व्यक्त करतात. केनियाच्या शेल्डड्रीक वाईल्डलाईफ ट्रस्टने (Sheldrick Wildlife Trust) हत्तीच्या प्रणयाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. माणसांप्रमाणे हत्ती सुद्धा किसींग (eleephants kisses) करतात. पण हत्तीचे हे किसींग कशा पद्धतीचे असेल? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्याचे उत्तर शेल्डड्रीक वाईल्डलाईफ ट्रस्टने शेअर केलेल्या व्हिडीओमधून मिळू शकते.

हा व्हिडीओ पठडीतल्या नेहमीच्या व्हिडीओपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर निश्चितच तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेल्डड्रीक वाईल्डलाईफ ही केनियामधील हत्तींची सुटका आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी संस्था आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा: चीनची ५६ फायटर विमानं घुसली तैवानमध्ये

'एलिफंट किसेस' असा त्यांनी मेसेज लिहिला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत १६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा आकडा आणखी वाढतच आहे. तीन हजार लाईक्स मिळाले आहेत. या सुंदर व्हिडीओवर नेटीझन्स वेगवेगळ्या कमेंटस करत आहेत.

loading image
go to top