esakal | Lakhimpur: शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रयत्न; पवारांचा तीव्र निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

लखीमपूर : शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रयत्न - शरद पवार

sakal_logo
By
सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलानाला आता एक वर्ष पुर्ण झालं असून, हे आंदोलन आता उत्तर प्रदेशमध्ये देखील तीव्र रुप धारण करताना दिसतंय. त्यातच आज उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या संघर्षात ४ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हेही वाचा: "फोडा फोडीचे राजकारण करणारा भाजप देसी अंग्रेज"

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर कार घातली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकरी जखमी झाले आहे. शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला असून, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

loading image
go to top