esakal | Lakhimpur violence: आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur violence

Lakhimpur violence: आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष आज अखेर विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीसाठी उपस्थित राहिले. पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अजय यांना चौकशीला सामोरे जावे लागले. अजय हे आज सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी पोलिसांसमोर हजर झाले. याआधी पहिल्यांदा पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर त्यांनी शुक्रवारी चौकशीला उपस्थित राहणे टाळले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान स्थानिक पोलिसांनी या चौकशीबाबत माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

दुसरीकडे अजय मिश्रा यांच्या चौकशीनंतर पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांचे मौन आंदोलन थांबविले. लखीमपूरमधील हिंसाचारात मरण पावलेले स्थानिक पत्रकार राम कश्‍यप यांच्या घराबाहेर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धू यांनी मौन धरणे आंदोलन सुरू केले होते. आज साधारणपणे साडेअकराच्या सुमारास त्यांनी हे आंदोलन थांबविले.‘‘ हा सत्याचा विजय आहे. एखादी व्यक्ती राजा असेल पण ती न्यायापेक्षा मोठी असू शकत नाही. जिथे न्याय असतो तिथेच शासन देखील असते आणि जिथे न्याय नसतो तिथे कुशासन असते. हा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा विजय आहे.’’ असे मत सिद्धू यांनी मांडले. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली पथक

पोलिस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) हे आशिष मिश्रा यांची चौकशी करते आहे. पोलिसांच्या पथकाने आशिष यांच्यासाठी दोन डझनहून अधिक प्रश्‍न तयार केल्याचे बोलले जाते. आशिष यांनी पहिल्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यानंतर पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस बजावली होती.

हेही वाचा: Cruise Party: एनसीबीकडून आणखी एका तस्कराला अटक

मिश्रा स्कूटरवर बसून आले

आशिष मिश्रा आज चौकशीला उपस्थित राहणार असल्याने लखीमपूर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज सकाळी दहा वाजल्यापासूनच अनेक बडे अधिकारी कार्यालयामध्ये यायला सुरूवात झाली होती. साधारपणे १० वाजून ३८ मिनिटांनी एका स्कूटरवर बसून आलेले आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर राहिले. मिश्रा यांच्यासोबत यावेळी भाजपचे स्थानिक आमदार योगेश वर्मा देखील उपस्थित होते. आशिष हे वर्मा यांच्या स्कूटरवरच बसून आले होते.

loading image
go to top